Join us
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:40 IST

BSNL Christmas Bonanza Offer : बीएसएनएलने आपल्या वापरकर्त्यांसाठी बीएसएनएल क्रिसमस बोनान्झा ऑफर नावाची एक नवीन ऑफर लाँच केली आहे.

BSNL Christmas Bonanza Offer : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवल्यामुळे ग्राहकांचा ओढा सरकारी मालकीच्या 'भारत संचार निगम लिमिटेड'कडे वाढला आहे. आता ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे औचित्य साधून बीएसएनएलने आपल्या नव्या ग्राहकांसाठी 'ख्रिसमस बोनान्झा' ही विशेष ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत नवीन युजर्सना केवळ १ रुपयात महिनाभर मोफत सेवा मिळणार आहे.

काय आहे '१ रुपया'चा प्लॅन?बीएसएनएलच्या या विशेष ऑफरमध्ये ग्राहकांना केवळ १ रुपया खर्च करून अनेक फायदे मिळणार आहे.

  • व्हॅलिडिटी : पूर्ण ३० दिवसांची वैधता.
  • कॉलिंग : कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग.
  • डेटा : दररोज २ जीबी (२GB) हाय-स्पीड डेटा.
  • एसएमएस : दररोज १०० फ्री एसएमएस.
  • फ्री सिम कार्ड : नवीन सिम कार्डसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

ऑफरची मुदत आणि अटीही ऑफर केवळ अशा लोकांसाठी आहे जे नवीन बीएसएनएल सिम खरेदी करतील किंवा आपले जुने सिम बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील. ही 'ख्रिसमस बोनान्झा' ऑफर ५ जानेवारी २०२६ पर्यंत वैध आहे. ५ जानेवारीपूर्वी नवीन सिम घेणाऱ्यांनाच या १ रुपयाच्या प्लॅनचा लाभ घेता येईल.

वाचा - स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात

५जी कडे वेगाने वाटचालबीएसएनएल केवळ स्वस्त प्लॅन्सवरच थांबलेले नाही, तर आपल्या नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्येही मोठी सुधारणा करत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये बीएसएनएलची ४जी सेवा यशस्वीपणे सुरू झाली आहे. सध्या बीएसएनएल ५जी नेटवर्कवर वेगाने काम करत असून, लवकरच ग्राहकांना ५जी च्या हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव घेता येणार आहे. खासगी कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे दर अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : BSNL's Christmas Dhamaka: Unlimited Calling & Data for Just ₹1!

Web Summary : BSNL's 'Christmas Bonanza' offers new users unlimited calling, 2GB daily data, and 100 SMS for ₹1 for 30 days. Offer valid until January 5, 2026, for new SIM purchases or porting. BSNL is also improving network connectivity with 4G and 5G.
टॅग्स :बीएसएनएलजिओएअरटेलव्होडाफोन आयडिया (व्ही)